ISRO शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखालील रामसेतूचा नकाशा!

298
ISRO शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखालील रामसेतूचा नकाशा!
ISRO शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखालील रामसेतूचा नकाशा!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) (ISRO) शास्त्रज्ञांनी अमेरिकन सॅटेलाईट डेटाच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा (Ram Setu) नकाशा तयार केला आहे. हा नकाशा रेल्वेच्या बोगी/कंपार्टमेंटइतका मोठा आहे. या नकाशानुसार २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर इतकी आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी राम सेतूचा तपशीलवार नकाशा तयार केला असून समुद्राखालचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे.

(हेही वाचा –Mumbai Crime: लोकल ट्रेनसमोर आयुष्य संपवणाऱ्या बापलेकाच्या घरी सापडली चिठ्ठी, काय आहे चिठ्ठीत?)

रामसेतूबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. नासाने अमेरिकेच्या ICESat-2 या सॅटेलाईटच्या मदतीने इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा १० मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. हा नकाशा २९ किमी लांबीच्या राम सेतूचा पहिला पाण्याखालील नकाशा आहे. राम सेतूचा ९९.९८ टक्के भाग उथळ आणि अतिशय उथळ पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे जहाजांद्वारे त्याचे सर्वेक्षण करणे शक्यच नाही. (ISRO)

(हेही वाचा –Nashik Accident : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयावर काळाचा घाला; मालेगावातील हृदयद्रावक घटना)

रामसेतू तामिळनाडूच्या पंबन बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांच्यामधील सामुद्रिक रचना आहे. दक्षिणेत या सेतूला ‘रामसेतू’ याचं नावाने ओळखलं जातं, तर श्रीलंकेत याला ‘अडंगा पालम’ किंवा ‘ॲडम्स ब्रिज’ असे म्हटले जातो. राम सेतू हा भारतातील रामेश्वरम बेटाच्या दक्षिण-पूर्वेकडील धनुषकोडीपासून, श्रीलंकेतील मन्नार बेटाच्या उत्तर-पश्चिम टोकापर्यंत, तलाईमन्नारपर्यंत पसरलेला आहे. चुनखडीच्या साखळीने बनलेली समुद्रावर तयार करण्यात आलेली पुलासारखी रचना आहे. रामसेतूचा काही भाग पाण्याच्या वर दिसतो. रामसेतूवर खडक किंवा झाडे नाहीत. रामसेतू हा लंकेत जाण्यासाठी रामाच्या वानरसेनेने बांधलेला पूल आहे. (ISRO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.