CHANDRAYAN-3 : विक्रम लँडरला विलग करण्यात इस्रो ला यश

विक्रम लँडर चंद्रापासून १०० किमी अंतरावर

230
विक्रम लँडरला विलग करण्यात इस्रो ला यश
विक्रम लँडरला विलग करण्यात इस्रो ला यश

शेवटच्या टप्प्यात भारताचे  चांद्रयान-3 ला  (Chandrayaan-3) मोठं  यश मिळालं असून विक्रम लँडरला विलग करण्यात इस्रो ला यश मिळाले आहे. गुरुवारी दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी दोन तुकड्यां मध्ये विभागले गेले आहे. या प्रक्रियेत चांद्रायन-३ चे प्रोप्लशन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल  वेगळॆ केले गेले आहे.

विक्रम लँडर चंद्रापासून १०० किमी अंतरावर आहे. आता ते चंद्राच्या भोवती फिरेल आणि हळूहळू लँडिंगच्या  दिशेने जाऊन २३ ऑगस्ट ला चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल.शुक्रवारी दुपारी ४ वाजता लँडर मॉड्युल खालच्या कक्षेत डीबूस्ट म्हणजेच भारत चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या अगदी जवळ येऊन पोहचले आहे. चांद्रयान-3 CHANDRAYAN-3  चंद्रावर यशस्वीरित्या पोहचले तर भारत हा चौथा देश असेल.

(हेही वाचा : भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा)

संपूर्ण आठवडाभर चंद्रयानाच्या हालचालीवरच सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. इस्रोने या बाबतची अधिकृत माहिती दिली आहे.  इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर गुरुवारी वेगळे झाले. अशा स्थितीत दोन्ही चंद्रांच्या कक्षेच्या 100 x 100 कि.मी. रेंजमध्ये असतील, दोन्ही काही अंतरावर ठेवल्या जातील जेणेकरून त्यांच्यामध्ये धडक होणार नाही. जेव्हा लँडर वेगळे होईल, तेव्हा ते लंबवर्तुळाकार रीतीने फिरेल आणि त्याचा वेग कमी करेल, हळूहळू तो चंद्राच्या दिशेने जाईल. ही प्रक्रिया १७ ऑगस्टला होईल आणि त्यानंतर १८ ऑगस्टला एक महत्त्वाचा क्षण येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.