इस्रोचे आणखी एक मोठे उड्डाण, PSLV-C52 यशस्वीरीत्या प्रक्षेपित! पाहा व्हिडिओ

95

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.59 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C52 द्वारे EOS-04 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यासोबतच आणखी दोन छोटे उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले. 14 फेब्रुवारी रोजी इस्रोची 2022 मधील पहिली प्रक्षेपण मोहीम यशस्वी झाली. शुभारंभासोबतच उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

हे फायदे होतील

पृथ्वीचे निरीक्षण करणार्‍या उपग्रह EOS-04 ला PLLV-C52 द्वारे कक्षेत पाठवण्यासाठी 25 तासांचे काउंटडाउन 13 फेब्रुवारीच्या सकाळी सुरू झाले होते. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे जो कृषी, वनीकरण, वृक्षारोपण, मातीची आर्द्रता, जलविज्ञान आणि पूर मॅपिंग यांसारख्या अनुप्रयोगांची उच्च दर्जाची छायाचित्रे प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

( हेही वाचा :फडणवीसांच्या सागर निवासस्थानासमोर भाजप आणि काॅंग्रेस भिडणार ? )

पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी PSLV-C52 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल देशातील अंतराळ शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. PSLV-C52 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आमच्या अंतराळ शास्त्रज्ञांचे अभिनंदन, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. आपल्या अभिनंदन संदेशात, ते पुढे म्हणाले की, “EOS-04 उपग्रह कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता आणि जलविज्ञान तसेच पूर मॅपिंगसाठी सर्व हवामानातील उच्च दर्जाचे छायाचित्र देणार आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.