२०२८ पर्यंत १० टन वजनाचा उपग्रह ISRO स्वयं क्षमतेने पाठवणार

618
अंतराळ क्षेत्रात भारत जगाच्या बरोबरीने झेप घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुढील तीन वर्षांत अंतराळात अवजड उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता संपादन करेल. सध्या इस्रोला ४ टन वजनापेक्षा जास्तीचे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी नासावर अवलंबून राहावे लागते. २०२८ सालापर्यंत इस्रो टन वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवू शकणार आहे.
याशिवाय २०३५ पर्यंत इस्रो (ISRO) भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, येत्या ५ वर्षात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आमचे पहिले मॉड्यूल कक्षेत प्रक्षेपित केले जाईल..नासाच्या नंतर इस्रोचा जन्म झाला. असे असूनही, नासानेही इस्रोच्या यशाची कबुली देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रोची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रोने आतापर्यंत ४३२ हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी ३९७ गेल्या दहा वर्षांत झाले आहेत.
इस्रोने सन २०२५ साठी आपले लक्ष्यही निश्चित केले आहे. २०२५ मध्ये, नाविक ०२, युएस सॅटेलाईट फॉर मोबाईल आणि बायोमिना हे जानेवारीतील प्रमुख उपग्रह इस्त्रो (ISRO) प्रक्षेपित करणार आहे..इस्रो, नासाच्या सहकार्याने, फेब्रुवारी-मार्चमध्ये मोबाईल फोनची सुविधा देण्यासाठी एक उपग्रह पाठवणार आहे. सध्या वापरले जात असलेले सेल्युलर नेटवर्क जगाच्या सुमारे १५ टक्के भाग आहे. त्यामुळे ऑफ-द-ग्रिड ठिकाणी प्रवास करताना, मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसते. पण जेव्हा ते थेट उपग्रहाद्वारे जोडले जाईल तेव्हा या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही..अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी भारताने जानेवारी महिन्यात ‘नाविक ०२’ प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली भारताला अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन यांच्या बरोबरीत आणेल. (ISRO)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.