आता ISRO उलघडणार ब्लॅक होल्सचे रहस्य

273

चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ब्लॅक होल्सचे रहस्य शोधणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल, जे इतर खगोलीय घटनांसह ब्लॅक होल्सची माहिती गोळा करेल.

मिशन 28 डिसेंबरपर्यंत प्रक्षेपित केले जाईल

यापूर्वी NASA ने अशी मोहीम राबवली आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नाव एक्स-रे पोलरीमेट्री आहे, ही एक प्रकारचा सॅटेलाईट आहे, जी विविध प्रकारच्या खगोलीय स्त्रोतांबद्दल माहिती देईल. यासोबत POLIX आणि XSPECT हे दोन पेलोड्सही असतील. या मिशनवर बरेच दिवस काम चालू होते. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी स्वतः जाहीर केले होते की, हे अभियान वर्षअखेरीस सुरू केले जाईल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे हे पहिले ध्रुवीय मिशन या वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित होते. आता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याची तारीख जाहीर केली आहे. एचटीच्या एका अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हे मिशन 28 डिसेंबरपर्यंत प्रक्षेपित केले जाईल. शास्त्रज्ञांच्या मते या मोहिमेचा उद्देश तीव्र क्ष-किरण स्त्रोत आणि ध्रुवीकरणाचा तपास करणे आहे. हे खगोलशास्त्रातील रहस्ये सोडवण्याबरोबरच टाईम डोमेन अभ्यास आणि स्पेक्ट्रोस्कोपीवर लक्ष केंद्रित करेल, जे भारतासाठी खूप खास असणार आहे.

(हेही वाचा नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा; PM Narendra Modi यांची घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.