भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका पथकाने शुक्रवारी पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली आणि एका आठवड्यापूर्वी आकाशातून पडलेल्या अज्ञात वस्तूंची पाहणी केली. बूस्टर रॉकेटचे अवशेष मानल्या जाणार्या काही अज्ञात वस्तूंची पाहणी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या शास्त्रज्ञांच्या पथकाने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली.
सखोल तपासणी केली जाणार
गेल्या आठवड्यात मध्य भारतातील काही भागांवर रात्रीच आकाशातून अज्ञात वस्तू पडल्या होत्या. लाडबोरी गावात एका मोकळ्या भूखंडात लोखंडी रिंग पडलेली सर्वात पहिल्यांदा आढळली. मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग व्यतिरिक्त, स्थानिकांना पवनपूर गावात एक सिलेंडरसारखी वस्तूदेखील दिसली, त्यानंतर परिसरात असे आणखी पाच सिलेंडर सापडले. नागपुरातील भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने सखोल तपासणीनंतरच वस्तूंच्या स्वरूपावर भाष्य करता येईल, अशी माहिती दिली.