मुसलमान आणि शांतता?

166

सामान्यपणे सगळे धर्म मानवता शिकवतात असे मानले जाते. यावर अनेकांचा दृढ विश्वास आहे. असा विश्वास असणे यात अयोग्य असे काही नाही. तथापि जगात घडणाऱ्या घटनांकडे पाहिले तर मुसलमान धर्म हा शांतता आणि मानवता शिकवणारा धर्म आहे असे आपण म्हणू शकत नाही. याचा अनुभव शेकडो वर्षे अख्ख्या जगाने घेतला आहे. आपणही तो असंख्य वेळेला घेत आलो आहोत. तरीही हिंदू समाज आजही अत्यंत सहिष्णुतेने मुस्लिम समाजाशी वागतो असे आढळून येते.

( हेही वाचा : उबेरमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव! आरडाओरड केल्यानंतर झाली सुटका )

आपल्या देशाने सर्व समावेशक अशी भूमिका घेऊन त्याला अनुसरून घटना आणि कायदे निर्माण केले. काही प्रमाणात हिंदूंपेक्षा मुसलमानांना अधिक सवलती देण्यात आल्या.‌ सर्वधर्मसमभाव या तत्वाचा हिंदूंनी स्वीकार केला. तसा स्वीकार मुसलमान समाजाने केला असे आढळून येत नाही. हिंदू मुसलमान ऐक्य निर्माण व्हावे यासाठी हिंदू राजकीय दृष्ट्या हिंदी झाले पण मुसलमान मात्र राजकीय दृष्ट्या मुसलमानच राहिले. त्यात देशातले अनेक राजकीय नेते मुसलमानांच्या अधार्मिक, अमानवीय, अन्यायी, अत्याचारी कृत्यांना पाठीशी घालतात. याचाही अनुभव आपण सर्वांनीच वेळोवेळी घेतला आहे.

हा देश सर्वांचा आहे, असे सांगितले जाते पण मुसलमानांचा विशेष देश आहे असा अनुभव हिंदूंनी घेतला आहे. देशात बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या, मुंबईतील १८५७च्या शूर वीरांचे स्मारक उध्वस्त केले गेले, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज जाळला जातो, पाकिस्तानच्या विजयी घोषणा दिल्या जातात, देशातल्या राष्ट्रीय संपत्तीवर मुसलमानांचा अधिकार पहिला आहे असे अधिकृतपणे माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषित केले, अफजल खान वधाच्या चित्राला सार्वजनिक ठिकाणी लावण्यास बंदी घालण्यात आली, या सर्व घटना घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या आहेत का? असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो. वंदे मातरम म्हणणार नाही, राष्ट्रगीत गाणार नाही, राष्ट्रध्वजाला वंदन करणार नाही, असे सांगणारे मुसलमान या देशाशी एकनिष्ठ आहेत. यावर हिंदूंनी विश्वास ठेवला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.‌ या सर्व कृत्यांमध्ये कोणत्या प्रकारची राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा जाणवते? याचे उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळत नाही.

छत्रपती शिवराय हे या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या जयंती उत्सवाला अपशकुन करणारे मुसलमान आहेत. यांना टिपू सुलतान, अफजल खान, औरंगजेब, या आणि अशा परकीय इस्लामिक आक्रमकांविषयी ममत्व अधिक असल्याचे हिंदू समाजाने अनेक वेळा अनुभवले आहे. असाच अनुभव आजही आपण घेत आहोत. ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मिलाद-उन-नबी म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव मुसलमान समाजातर्फे साजरा करण्यात आला. त्यांनी त्यांच्या श्रद्धास्थानांचा उत्सव साजरा करावा. त्यासाठी आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही. तथापि असा उत्सव साजरा करताना दिल्या गेलेल्या घोषणांमुळे देशातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती वातावरण कलुशीत होण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊ शकते. मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव साजरा करताना ‘सर तन से जुदा’ अशा घोषणा उत्तर प्रदेश राजस्थान मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दिल्या गेल्या. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

लव्ह जिहाद, हलाल जिहाद, देशातली भूमी अवैधपणे स्वतःच्या नावावर करण्याचा सपाटा वक्फ बोर्डाने लावला आहे हा भूमी जिहाद आहे. पीएफआयच्या कारवाया, त्याचबरोबर वर्ष २०४७ मध्ये हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करणार असल्याची घोषणा देणाऱ्या मुसलमान संघटना कोणत्या प्रकारची शांतता, बंधुभाव निर्माण करतात? मुसलमानांना सर्व प्रकारच्या सवलती हव्या आहेत. पण ते राष्ट्रनिष्ठा व्यक्त करणार नाहीत. या देशातल्या बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाबरोबर मिळून मिसळून राहण्यास ते सिद्ध नाहीत. या देशाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतन करावा असे त्यांना वाटत नाही. त्यांना या देशातली न्याय पद्धती त्यांच्या शरीयत कायद्यावर आधारित असावी अशी त्यांची इच्छा आहे. ते त्यांच्या सोयीप्रमाणे घटना आणि देशातील कायदा स्वीकारतात. इतर वेळी आपल्या इस्लाम धर्माची शिकवण पुढे करून त्याच घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करतात. याचाच अर्थ त्यांना हा देश इस्लामिक राष्ट्रात रूपांतरित करायचा आहे हेच सिद्ध होते. त्यासाठीच त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यावर मुसलमान आणि शांतता यांचा परस्पर संबंध आहे यावर विश्वास ठेवता येत नाही.

सावरकरांनी याबाबत सावधतेचे इशारे दिले होते. मुसलमानांसाठी संपूर्ण वंदे मातरम म्हणायचे नाही असा निर्णय जेव्हा काँग्रेसने घेतला त्याचवेळी सावरकरांनी सांगितले होते उद्या हेच लोक वंदे मातरम हा शब्द उच्चारण्यास विरोध करतील. आज याची अनुभूती घेत आहे. विद्यमान केंद्रीय सरकार मुसलमानांच्या या आततायी वृत्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या देशाचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्याच्या त्यांच्या महत्त्वकांक्षेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे ही जमेची बाजू आहे.

तरीसुद्धा हिंदू समाजाने अत्यंत सावध राहून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आपसातली भांडणे बाजूला सारली पाहिजेत. राष्ट्रघातक प्रवृत्तीच्या विरोधात आपण संघटित झालो नाही तर पुनश्च इस्लामिक अत्याचारी राजवटीशी सामना करण्याची वेळ आपल्यावर येईल. ती येऊ नये म्हणूनच आपण संघटित होणे आवश्यक आहे. जे हिंदू नेते अतिरेकी मुसलमानांचा पक्ष घेतात, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे मुसलमानांचा तुम्ही कितीही पक्ष घेतला तरीसुद्धा त्यांच्या दृष्टीने तुम्ही काफिरच आहात. यापेक्षा अधिक सांगणे न लगे.

(लेखक व्याख्याते आहेत.)
९८३३१०६८१२

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.