संयुक्त राष्ट्र महासभेत शनिवारी भारताने पाकिस्तानच्या खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे फर्स्ट सेक्रेटरी मिजितो विनिटो म्हणाले की, या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले हे खेदजनक आहे. शांततेच्या बाता करुन दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम आहे. पाकिस्तानच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानचे कान टोचले.
…तरच पुढे शांतता कायम राहील
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशात सुरु असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केला आहे. विनिटो म्हणाले की, जो देश आपल्याला आपल्या शेजा-यांसोबत शांतता हवी आहे, असा दावा करतो, तो कधीही सीमेपलीकडील दहशतवादाला समर्थन किंवा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना आश्रय देणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना या मंचावरुन सांगितले होते की, मला वाटते की आता भारताने दोन्ही देश एकमेकांशी जोडलेले असल्याचा संदेश समजून घेण्याची वेळ आली आहे. यु्द्ध हा उपाय नाही, केवळ शांततापूर्ण संवादानेच काश्मीरचे प्रश्न सुटू शकतात जेणेकरुन जग पुढील काळात अधिक शांततामय होईल.
( हेही वाचा: खड्डयांवरील खर्चात भ्रष्टाचार; माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली चौकशीची मागणी )
त्यापेक्षा दहशतवाद संपवा- भारत
मिजितो विनिटो म्हणाले की, भारतावर खोटे आरोप करण्यापूर्वी पाकिस्तानने स्वत: च्या काळ्या कर्तृत्वांबद्दल सांगावे. जम्मू- काश्मीरवर दावा करण्याऐवजी इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा.
Join Our WhatsApp Community