रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक दिवाळखोरीची टांगती तलवार लटकत असताना, आता काळा पैसा कायद्यांतर्गत अनिल अंबानींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने अनिल अंबांनी यांना त्यांच्या अघोषित 420 कोटींच्या करचोरी प्रकरणात नोटीस पाठवली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृ्त्तानुसार, अनिल अंबानी यांनी जाणीपूर्वक करचोरी केली असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. अनिल अंबानी यांनी परदेशी बॅंकेत असलेल्या खात्यातील रक्कमेची माहिती आयकर अथवा संबंधित विभागांना दिली आहे. याच प्रकरणी अनिल अंबानी यांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कारणे दाखवा नोटीस बजवाण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्याविरोधात ब्लॅक मनी इम्पोजिशन ऑफ टॅक्स अॅक्ट 2015 तील कलम 50 आणि 51 नुसार खटला चालवण्यात येऊ शकतो. या कलमानुसार दंडासह 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
( हेही वाचा: फ्लोअर टेस्टपूर्वी बिहारमध्ये राजकीय भूकंप; RJD नेत्यांवर CBI कडून छापेमारी सुरु )
आयकर विभागाच्या नोटिशीत काय?
आयकर विभागाने बजावलेल्या नोटिसीत 31 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. पीटीआयने याबाबत अनिल अंबानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. आयकर विभागाच्या नोटिसीनुसार, अंबानी हे बहामास येथील डायमंड ट्रस्ट आणि नाॅदर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड कंपनीचे इकाॅनाॅमिक कंट्रीब्ययूटर आणि बेनेफिशियल ऑनर आहेत. नाॅदर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड कंपनीची नोंदणी British Virgin Islands वर करण्यात आली. हे ठिकाण करचोरी करणा-यांसाठी स्वर्ग मानले जाते.