वेळेत कर न भरल्यामुळे तसेच चिनी मोबाईल कंपन्यांवर बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. राज्यात मुंबईसह दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये सकाळी ९ वाजता एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. चिनी मोबाईल कंपनी ओप्पो (Oppo) आणि एमआयच्या (Mi) कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.
आयकर विभागाचे छापे
आयकर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनी मोबाईल कंपनी एमआय(Mi), ओप्पो (Oppo) तसेच इतर अनेक कंपन्यांसह वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि सीएफओ यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत. सर्व चिनी कंपन्यांच्या उत्पादन युनिट्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि गोदामांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. याआधीही भारताने स्वदेशी उत्पादनाचा नारा दिला होता.
( हेही वाचा : आता तृतीयपंथी तुमचे करणार ‘रक्षण’ )
करांचे उल्लंघन
या कंपनीच्या भारतात असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांचीही इन्कमटॅक्स विभागाने चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत या कंपन्यांनी विविध प्रकारच्या करांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मोबाईल फोन, कर्ज-अर्ज आणि वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या अनेक चिनी कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी अलीकडेच छापे टाकले होते. त्यानंतर आज देशभरात पडलेले छापे म्हणजे मोठी कारवाई असल्याचे मत उद्योग जगतातील जाणकारांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community