इटलीत मिळवा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घर

रोमच्या लॅटियम प्रदेशातील मेन्झा शहर हे आता स्वस्त दराने घर देणारे जगातील पहिले शहर बनले आहे.

123

स्वस्तात मस्त घर मिळवणं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण मुंबईसारख्या शहरात असं घर स्वप्नातही मिळत नाही. मुंबईपासून काही अंतर लांब घर घेताना सुद्धा आपल्यासारख्या सामांन्यांच्या खिशाला घरघर लागते. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी दरात घर घेता येईल, तेही इटलीत… तर एक तर तुम्ही त्याचा ताप चेक कराल, नाहीतर कालची उतरली नाही वाटतं अजून?, असा प्रश्न विचाराल. पण खरंच इटलीमध्ये 100 रुपयांपेक्षाही कमी दरात असे घर घेता येणार आहे.

काय आहे योजना?

एका अनोख्या योजनेचा भाग म्हणून इटलीतील ग्रामीण भागांत असलेल्या नयनरम्य गावांत कोणीही 1 युरो म्हणजेच 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे घर खरेदी करू शकते. इटलीची राजधानी असलेल्या रोमच्या लॅटियम प्रदेशातील मेन्झा शहर हे आता स्वस्त दराने घर देणारे जगातील पहिले शहर बनले आहे. त्यासोबतच या प्रदेशातील अनेक रिक्त घरे आणि जमिनींची भविष्यात विक्री केली जाईल असेही नमूद करण्यात आले आहे. मेन्झामधील पहिल्या काही घरांच्या विक्रीसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या 28 ऑगस्टला बंद होणार असली, तरी या भागातील आणखी काही घरे खरेदीदारांसाठी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः ऑनलाईन शॉपिंग करताय? मग या साईट्सपासून सावध रहा)

हे आहे योजनेमागचे कारण

मेन्झाचे महापौर क्लॉडिओ स्परदुती यांनी आपल्या या मूळ गावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी पॅक्ट फॉर दि रिबर्थ हा नवा करार सुरू केला आहे. मेन्झाच्या शांत भागात नवीन जनजीवन सुरू करण्यासाठी हे करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या भागात वापरात नसलेल्या जमिनी पुन्हा वापरात आणण्यासाठी नव्या खरेदीदारांना आकर्षित करणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. मूळ कुटुंबे आमच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची जुनी घरे आमच्याकडे सोपवतात. त्यानंतर पारदर्शकता राखण्यासाठी आम्ही ती घरे आमच्या वेबसाईटवर विशिष्ट सार्वजनिक नोटिसद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करुन देतो, असे महापौर क्लॉडिओ स्परदुती यांनी सांगितले.

(हेही वाचाः रोड ट्रीपला जायचंय… टोलचा खर्च किती होईल? गुगल मॅप देईल उत्तर)

काय आहेत अटी?

या स्वस्त घरांसाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. ज्यांना मेन्झातील मालमत्ता खरेदी करण्याची मान्यता मिळाली आहे त्यांना तीन वर्षांच्या आत त्या मालमत्तेचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन या करारात द्यावे लागेल. खरेदी केलेल्या मालमत्तेचे रुपांतरण नेमके कशात होणार आहे, याबाबतची माहिती देखील खरेदीदारांनी देणे गरजेचे आहे. तसेच 5 हजार युरोंची ठेव हमी रक्कम देखील जमा करावी लागणार आहे. मालमत्तेचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे पैसे परत करण्यात येतील.

बेबंदशाहीचा करावा लागणार सामना

द इंडिपेंडंटने दिलेल्या योजनेच्या वेबसाइटवरील तपशीलांच्या भाषांतरानुसार, शहराच्या प्रशासनाला शहराच्या मध्यभागी असलेल्या प्राचीन, मध्ययुगीन गावाच्या बेबंदशाहीचा सामना करावा लागणार आहे, जे रोमपासून 60-70 किमी दक्षिण-पूर्वेकडे आहे.

(हेही वाचाः जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांमध्ये भारतातील ‘या’ शहरांचा समावेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.