ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण आहात? दरमहा 69,000 पगाराच्या नोकरीची संधी

तुम्ही दहावी पास आहात का… असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात म्हणजेच इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये (ITBP) नोकरीची सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाने गट C मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार डिसेंबरपर्यंत recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती मोहिमेत एकूण 287 रिक्त जागांवर भरती होणार आहे, त्यापैकी 246 जागा कॉन्स्टेबल ट्रेड्समन (पुरुष) आणि 41 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (महिला) साठी आहेत. कॉन्स्टेबल टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तर कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमॅन आणि बार्बर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावी शिक्षण पूर्ण झालेले असावे.

(हेही वाचा – Jio True 5G: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ‘इतका’ सुस्साट इंटरनेट स्पीड)

या 287 रिक्त पदांवर होणार भरती

  • कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं
  • कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं
  • कॉन्स्टेबल मोची : 31 पदं
  • कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं
  • कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं
  • कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं

वयोमर्यादा आणि वेतन

निवड प्रक्रियेमध्ये पीईटी/पीएसटी, लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असणार आहे. कॉन्स्टेबल, टेलर, गार्डनर आणि कॉबलर या पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 से 23 वर्षादरम्यान तर कॉन्स्टेबल, सफाई कर्मचारी आणि बार्बर पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे. वरील पदांवर निवड झाल्यानंतर उमेदवारांना स्तर तीननुसार वेतन देण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, उमेदवाराला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रूपयांपर्यंत वेतन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी https://itbpolice.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here