जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांचा यूएस इंडिया इंपोटर्स कौन्सिलच्या दहाव्या वर्धापनदिनी कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कुलाबा येथील ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
( हेही वाचा : कर्ज महागली! कोरोनाच्या काळानंतर २ वर्षांनी वाढवला रेपो दर )
कोविड योद्धा म्हणून सत्कार
२०२० मध्ये संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावले. याकाळात हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ वर्कर, स्वच्छता कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवक, रुग्णवाहिका चालक यासोबतच विविध सामाजिक संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कोविड काळात राज्य शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व व रूग्णसेवेचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या लाटेत त्यांना प्रथम सांगली-मिरज आणि नंतर धुळे येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. यानंतर डॉ. पल्लवी सापळे यांनी २९ मार्च २०२२ रोजी जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला.
Join Our WhatsApp Community