जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) म्हणजे एक बिनधास्त अभिनेता. कुठेही जाऊन, कोणामध्येही मिसळून जाणारा दिलखुलास माणूस. ’क्या भिडू’ अशी हाक ऐकू आली की, हमखास समजायचं की जॅकी श्रॉफची एंट्री झालीय. जॅकी श्रॉफने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि १९८२ मध्ये ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपट त्याने लहानशी भूमिका केली होती.
(हेही वाचा – Indian Coast Guard Day 2024 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले भारतीय तटरक्षक दल)
चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित
मात्र १९८३ मध्ये आलेल्या हिरो या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. जॅकीने १३ भाषांमधील सुमारे २२५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला चार वेळा फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Award) सन्मानित करण्यात आले आहे. मात्र त्यांचे बालपण गरीबीत गेले. आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे जॅकी श्रॉफने ११ वी नंतर शिक्षण सोडले. सुरुवातीला शेफ आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता, मात्र जॅकीला नाकारण्यात आले. त्यानंतर तो ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करू लागला.
१९८० आणि १९९० या दोन दशकांत गाजवली कारकीर्द
त्यानंतर अचानक त्याला एकाने विचारले की मॉडलिंग करशील का? त्यावर त्याने होकार दिला आणि एक फोटोशूट केले. पुढे त्याला या क्षेत्राची ओढ लागली आणि स्वामी व हिरोमधून तो झळकला आणि बॉलिवुडचा भिडू अभिनेता झाला. १९८० आणि १९९० या दोन दशकांत त्याने नायक म्हणून आपली कारकीर्द गाजवली. १९८२ ला त्याने काम करायला सुरुवात केली आणि आजतागायत तो चांगले प्रदर्शन करतो. त्याचा मुलगा टायगर श्रॉफ देखील हिंदी सिनेमांमध्ये नायकाच्या भूमिका करतोय. सौदागर, अंगार, गर्दिश, खलनायक, रंगीला, अग्नि साक्षी, बॉर्डर अशा अनेक चित्रपटांत त्याने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पकडून ठेवले.
जयकिशन काकुभाई सराफ
जॅकी श्रॉफ हे त्याचं मोठ्या पडद्यावरचं नाव असलं तरी त्याचं खरं नाव वेगळंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, की काय आहे त्याचं खरं नाव? चला तर आम्ही तुम्हाला सांगतो, जॅकी श्रॉफचं खरं नाव आहे, “जयकिशन काकुभाई सराफ”… त्याचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबईत एका झाला. आज आपल्या भिडूचा वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… (Jackie Shroff)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community