जगन्नाथ प्रसाद दास (Jagannath Prasad Das) यांचा जन्म २६ एप्रिल १९३६ साली झाला. ते ओडीसा येथील ओडिसी भाषेतले भारतीय कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार आणि चित्रकार आहेत. जगन्नाथ प्रसाद दास यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला अलाहाबाद येथील विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ते भारताच्या प्रशासकीय सेवा कार्यांमध्ये काम करू लागले. जगन्नाथ प्रसाद दास (Jagannath Prasad Das) यांनी ओडीसा सरकार आणि भारताच्या केंद्र सरकारामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. सरकारी सेवांमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी आपल्या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग त्यांनी दिल्ली येथे जाऊन राहण्याचं ठरवलं. सध्या ते दिल्लीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात आनंदाने राहत आहेत.
उर्दू भाषेतल्या गझलांचा अनुवाद इंग्रजी भाषेत केला
दरम्यानच्या काळात जगन्नाथ प्रसाद दास (Jagannath Prasad Das) यांनी आपल्या स्वतःच्या कविता आणि इतर पुस्तकांचा इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेतल्या साहित्याचाही अनुवाद त्यांनी ओडिसी या भाषेत केला आहे. इंग्रजीच नाही तर त्यांनी गुलजार यांच्या उर्दू भाषेतल्या गझलांचा अनुवाद इंग्रजी भाषेत केला आहे. एका ओडिसी कवियत्रीच्या कवितांचा अनुवाद इंग्रजी भाषेत केला आहे. एवढंच नाही तर कॅथरीन क्लेमेंट हिच्या फ्रेंच भाषेतल्या साहित्याचा अनुवाद त्यांनी इंग्रजीतून केला आहे. तसेच त्यांनी वर्नर एस्पेनस्टॉर्म नावाच्या स्वीडिश कवीच्या कवितांचा अनुवाद ओडिसी भाषेत केला आहे. तसेच ओडिसी भाषेतले दलित कवी बासुदेव सुनानी यांच्या ओडिसी भाषेतल्या कवितांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे. अनुवाद करतेवेळी त्यांनी सर्वात आधी ओडिसी भाषेतल्या लघुकथांचा अनुवाद इंग्रजी भाषेत केला होता. तसेच त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील काव्यसंग्रह आणि मुलांसाठी चित्रपट संपादनही केले आहे.
Join Our WhatsApp Community