पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर थोड्याच वेळात, नवीन विमानतळासाठी जाणाऱ्या इंडिगोच्या पहिल्या विमानाने शनिवारी दुपारी दिल्लीहून उड्डाण केले. यावेळी या विमानातील पायलट आशुतोष शेखर यांनी विमानातील प्रवाशांचे स्वागत करून प्रभु श्री रामांचे (Ram Mandir) नाव घेऊन घोषणा दिल्या. या विमानातील त्यांचा हा व्हिडियो ‘एएनआय’ने शेअर केला आहे.
अयोध्येला जाणाऱ्या इंडिगोच्या पहिल्या विमानाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली याविषयी आशुतोष शेखर म्हणाले की, “मी भाग्यवान आहे. मला इंडिगोने या महत्त्वाच्या विमानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली.आम्हाला आशा आहे की, तुमचा प्रवास सुखकर आणि आनंदी असेल. आम्ही तुम्हाला अधिक आरामदायी प्रवासाकरिता साहाय्य करू. असे म्हणून विमानाचे नेतृत्व करणाऱ्या पायलट आशुतोष शेखर यांनी ‘जय श्री राम “, असे म्हणत घोषणा दिली. त्यांच्यामागे विमानातील प्रवाशांनीही ‘जय श्री राम “च्या घोषणा दिल्या.
(हेही वाचा –ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू Khashaba Jadhav यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा होणार )
२२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्रतिष्ठापना समारंभाच्या काही दिवस आधी शनिवारी सकाळी अयोध्येतील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. नवीन विमानतळाव्यतिरिक्त, मोदी यांनी पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा शुभारंभ केला, २ अमृत भारत आणि ६ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि 15,700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
#WATCH | IndiGo pilot captain Ashutosh Shekhar welcomes passengers as the first flight takes off from Delhi for the newly constructed Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham, in Ayodhya, UP. pic.twitter.com/rWkLSUcPVF
— ANI (@ANI) December 30, 2023
१० लाख प्रवाशांना सेवा पुरवता येतील…
अत्याधुनिक नवीन अयोध्या विमानतळाचा पहिल्या टप्प्याकरिता १,४५० कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आला आहे. विमानतळाच्या इमारतीचे क्षेत्रफळ ६,५०० चौरस मीटर असेल, ज्याद्वारे दरवर्षी सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा पुरवता येतील, तर इमारतीचा दर्शनी भाग आगामी राम मंदिराची वास्तुकला दर्शवणारा असेल. इमारतीचा आतील भाग स्थानिक कला, चित्रे आणि भगवान रामाचा थोर जीवनचरित्र दर्शविणाऱ्या भित्तीचित्रांनी सुशोभित केलेला आहे. अयोध्या विमानतळाची नवीन इमारतदेखील इन्सुलेटेड रूफिंग सिस्टम, एलईडी लाइटिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विमानतळावर २,२०० मीटर लांबीची आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे जी पहिल्या टप्प्यात एअरबस ए३२०, एटीआर-७२आणि बॉम्बार्डियर खाजगी विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ हाताळू शकते. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात धावपट्टी ३,२०० मीटरपर्यंत वाढवून विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी खुले केले जाईल. विमानतळामुळे या भागातील संपर्क व्यवस्था सुधारायला मदत होईल. यामुळे पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community