मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची जैन संघटनांची मागणी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

78

जैन संघटनांनी मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदीची मागणी केली आहे. मांसाहाराच्या जाहिराती सरसकट बंद करण्यात याव्या, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यामातून करण्यात येणारी मांसाहाराशी संबंधित जाहीरातबाजी बंद करण्यात यावी अशी जैन संघटनांची मागणी आहे. या जाहीरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. मांसाहाराला आमचा विरोध नाही. पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहिरात करणे हे त्या समुदायाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखे आहे. असा आरोप या जनहीत याचिकेतून करण्यात आला आहे. श्री ट्र्स्ट आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांनी एकत्रितपणे ही याचिका दाखल केली आहे.

( हेही वाचा: बांगलादेशमध्ये नदीत बोट पलटल्याने 20 जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.