जयपूर व गोवा विश्रांतीसाठी लोकप्रिय म्हणून कायम आहेत तर कोची, वाराणसी व विशाखापट्टणम भारतातील सर्वात जास्त बुक करण्यात येणारी पर्यटनस्थळे म्हणून आघाडीवर आहेत. दुसरीकडे दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता व चेन्नई ही स्थळे व्यावसायिकदृष्ट्या अव्वल स्थानी आहेत. जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या बुकिंग डेटाच्या संशोधनानुसार हा अहवाल समोर आला आहे.
जानेवारी-सप्टेंबर 2022 दरम्यान मागच्या वर्षीच्या याच कालवधीच्या तुलनेत विश्रांतीसाठी पर्यटनामध्ये 62 टक्के वाढ झाली. जयपूर व गोवा ही भारतातील लोकप्रिय विश्रांतीची स्थळे म्हणून आघाडीवर आहेत. कोची, वाराणसी व विशाखापट्टणमदेखील पर्यटकांमध्ये अव्वल क्रमांकाची स्थळे म्हणून उदयास आली आहेत. वारसा असलेल्या शहरांनंतर समुद्र किनारा असलेल्या स्थानांकडे कल स्पष्टपणे दिसून येतो.
( हेही वाचा: CET परिक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा? )
जागतिक स्तरावरील लोकप्रिय ठिकाणे
युरोप, नेदरलॅंड, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स ही काही लोकप्रिय स्थळे आहेत.
सर्वाधिक मागणी
मेट्रोपाॅलिटन शहरांपैकी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता आणि चेन्नईला सर्वाधिक प्रवासाची मागणी असेल.