Jaipur Tourist Places : जयपूरमधील ५ लोकप्रिय पर्यटन स्थळं

राजस्थान हे फार पूर्वीपासून भारतातील आघाडीचं पर्यटन राज्य आहे.

257
Jaipur Tourist Places : जयपूरमधील ५ लोकप्रिय पर्यटन स्थळं
Jaipur Tourist Places : जयपूरमधील ५ लोकप्रिय पर्यटन स्थळं
  • ऋजुता लुकतुके

अगदी सुरुवातीपासून राजस्थानातील रजपूतांचे राजवाडे आणि तिथलं सृष्टीसौंदर्य यामुळे भारताच्या पर्यटन नकाशावर राजस्थान हे आघाडीचं राज्य आहे. त्यातही जयपूर ही राजस्थानची राजधानी. आणि तिथला हवा महल आणि अमरफोर्ट बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही गाजलेला. त्यामुळे जयपूर हे शहर भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांचंही लाडकं पर्यटन शहर आहे. इथले राजवाडे, सुंदर तलाव आणि जपलेली वस्तूसंग्रहालय यामुळे हे शहर दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतं. (Jaipur Tourist Places)

जयपूरमधली अव्वल ५ पर्यटन स्थळं आज समजून घेऊया,

अमर फोर्ट

या राजवाड्याची एक आठवण म्हणजे प्रसिद्ध मुघल-ए-आझम चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या हे गाणं याच किल्ल्यातील शिशमहालात चित्रित करण्यात आलं आहे. अमर फोर्टला युनेस्कोनं जागतिक वारसा हक्क बहाल केला आहे. उंचावर वसलेला हा किल्ला पर्यटकांचं लाडकं ठिकाण आहे. आणि इथला लाईट अँड साऊंड शो ही इथला इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

अरावली पर्वताच्या एका टेकडीवर जयपूरपासून ११ किमी लांब आहे. सवाई मानसिंग राजे यांनी १६व्या शतकात हा किल्ला बांधला. आणि तेव्हापासून तो राजपूत घराण्यच्या राजांचं निवासस्थान आहे. इथलं मुघल शैलीतील बांधकाम आणि ४ वर्ग किलोमीटरवर वसलेला परिसर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. इथलं सुख निवास, जाई मंदिर, दिवाण ए खास आणि दिवाण ए आम या जागा प्रसिद्ध आहेत. (Jaipur Tourist Places)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती)

नाहरगड फोर्ट

नाहरगड किल्ल्यावर इतिहासात कधीही शत्रूचा हल्ला झाला नाही. त्यामुळे तो जशाच्या तशा टिकून आहे. इथं वेळ सांगण्यासाठी दर तासाला बंदूकीच्या फैरी झडत. या किल्ल्याच्या तटबंदीवरून जयपूर शहराचा नितांतसुंदर नजारा दिसतो.

इथला सुर्यास्त प्रसिद्ध आहे. आणि त्यावेळी जयपूर शहरावर पडणारी छाया लक्ष वेधून घेणारी आहे. जयपूर हे भारताचं गुलाबी शहर आहे. आणि सुर्यास्ताच्या वेळी गुलाबी रंग सोनेरी रंगात मिसळतो.

तसंच या किल्ल्यावरील पाडाव या हॉटेलमधला राजेशाही जेवणाचा थाटही लोकांना इथं खेचून आणतो.

जयगड फोर्ट

जयगड या किल्ल्याचं नाव प्रसिद्ध रजपूत राजा जयसिंग यांच्या नावावरूनच पडलं आहे. त्यांनीच हा किल्ला बांधला. आणि जयपूर शहराला हे नावही त्यांच्या नावावरूनच मिळालं आहे. किल्ल्यावर शत्रूने चडून जाऊ नये यासाठी किल्ल्याच्या भिंती सरळसोट उभ्या बांधलेल्या आहेत. आणि त्या विस्तीर्णही आहेत.

शिवाय नावावरून त्याला विजयी किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. या किल्ल्याचं वास्तूस्थापत्य हे ऐतिहासिक राजे-रजवाड्यांच्या उंची विलासी वृत्तीचं द्योतक म्हणून ओळखलं जातं. इथले मोठे मोठे महाल, त्यांचे शयन कक्ष आणि किल्ल्यावरील तलाव आणि मंदिरं या सगळ्यात सौंदर्य दृष्टी आहे. कंगना रानौतचा मनकर्णिका हा सिनेमा आणि शुद्ध देसी रोमान्स या दोन ब्लॉकबस्टर सिनेमांचं चित्रिकरण इथं झालं आहे. (Jaipur Tourist Places)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांच्या ‘या’ मागण्या सरकारने केल्या मान्य)

हवा महल

जयपूर शहराची ओळख गुलाबी शहर अशी आहे. आणि ती सार्थ ठरवणारा लाल – गुलाबी दगडांचा शहराच्या मध्यभागी असलेला एक महाल शहरात आहे तो म्हणजे हवा महल. विशेष म्हणजे या महलात एकही जिना नाही. फक्त छोट्या छोट्या शिड्या आहेत.

मधमाशांच्या पोळ्याचा आकार या महालाला आहे. आणि सगळ्यात वरचा पाचवा मजल्यावरील मंदिराचा कळस हा श्रीकृष्णाच्या मुकुटाप्रमाणे आहे.

हवा म्हणजे वाऱ्यासाठी या महालात असंख्य झरोके आहेत. आणि तेच या महालाचं सौंदर्य स्थळ आहेत. या महालातील हवा मंदिरही प्रसिद्ध आहे.

जल महाल

जल महाल हा जयपूरमधील एक असा विचित्र महाल आहे, जो पाच मजल्यांचा आहे. पण, यातील फक्त एकच मजला डोळ्यांना दिसतो. बाकी चार मजले चक्क पाण्याखाली आहेत. असा हा जल महाल आहे. वैशिष्ट्य पूर्ण रचनेमुळे इथं पर्यटक फोटो काढतात. उंटावरून सफर करतात.

रात्रीच्या वेळी महालावर सोनेरी रंगांचे दिवे लावण्यात येतात. आणि तेव्हा हा महाल खूप सुंदर दिसतो. तलावाच्या मधोमध असलेली ही इमारत दिव्यांनी उजळून निघाली की खूपच सुंदर दिसते. (Jaipur Tourist Places)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.