जम्मू-काश्मीर: जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक, मोठा रचत होता कट

220
Jaish-E-Mohammed चा एक गट सोशल मीडियावर कार्यरत; तरुणांना हेरून करतात दहशतवादी संघटनेत सामील

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी, २० मे रोजी जम्मू-काश्मिरातून जैश-ए-मोहम्मदच्या जिहादी दहशतवाद्याला अटक केली. मोहम्मद उबैद मलिक असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुपवाडा येथील रहिवाशी आहे. उबैद पाकिस्तानातील जैशच्या कमांडरच्या सतत संपर्कात होता. जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्न उबैद करत होता. पण त्याचा हा कट उधळून लावला.

अटक करण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या कमांडरला लष्कर आणि सुरक्षा दलांच्या हालचालींशी संबंधित माहिती पाठवत होता. एनआयएच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, हा जिहादी दहशतवादी गुप्त माहिती, विशेषत: सैन्य आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश कमांडरला देत होता.

(हेही वाचा – Pakistan’s Drone : अमृतसरमध्ये बीएसएफ जवानांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन)

एनआयएने आरोपींकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहेत. स्वत:हून दखल घेत, एजन्सीने २१ जून २०२२ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी साहित्य पाठवण्यात आल्याची गुप्त माहिती एनआयएला मिळाली होती. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सतर्क होत्या. याप्रकरणी एनआयएला रविवारी मोठे यश मिळाले आहे. एनआयएच्या तपासानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनद्वारे अनेकदा आयईडी आणि स्फोटके पाठवली जात आहेत. स्थानिक पातळीवरही स्फोटक साहित्य गोळा केले जात आहे. या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने अल्पसंख्याक आणि सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.