गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव (Jalgaon) कार्यालयाने धडक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगावच्या पथकाने मुक्ताईनगर ते ब-हाणपूररोड वरील पूर्णा नदीच्या काठावर सापळा रचला. याठिकाणी संशयित वाहन क्रमांक MH 20-EL-5849 व MH 20- EL-1737 या वाहनांतून प्रतिबंधित अन्न पदार्थांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन चौकशी करण्यात आली.
(हेही वाचा – Mumbai-Pune highway : मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; प्रवासी हैराण)
चौकशीदरम्यान (Jalgaon) महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आला आहे. रु. ३५ लाख ५२ हजार ५२० जप्त करुन वाहनचालक, क्लीनर, वाहन मालक व साठा मालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही पहा –
ही कारवाई (Jalgaon) अन्न सुरक्षा अधिकारी रा. मा. भरकड यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. संतोष कांबळे, सह आयुक्त, (नाशिक विभाग) सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या गुन्हयामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधित अन्न पदार्थ्यांच्या विक्री, वितरण व साठाविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याचे श्री. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Join Our WhatsApp Community