जळगावात रेल्वे मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 4 जण ठार, 13 जखमी

71

जळगाव जिल्ह्यातील पोचाऱ्यामध्ये मजुरांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात चाळीसगाव जवळ झाला असून या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. यासह यामध्ये १३ जण गंभीर जखमी झाले आहे तर दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मजुरांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं धुळे येथील शासकीय रुग्णलयात हलवण्यात आल्याची माहिती आहे

अशी घडली घटना

बुधवारी रात्री १० वाजेदरम्यान, रेल्वे मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला यामध्ये 4 जण जागीच ठार झाले. तर, इतर 13 जण जखमी झाली आहेत. हे सर्व मजूर क्रुझर या वाहनातून प्रवास करत होते. कोरोनदरम्यान रेल्वे वाहतूक सेवा बंद असल्याने हे सर्व मजूर, कामगार पाचोऱ्यातील डोंगरगाव येथून येजा करण्यासाठी दैनंदिन खासगी वाहनातून मनमाड मालधक्क्यावर मजुरी करत होते.

(हेही वाचा – सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र)

एम एच 13 एसी 5604 या क्रमांकाची क्रुझर गाडी पाचोरा तालुक्यातील हिरापूर गावाजवळ उलटली. या अपघात डोंगरगाव येथे राहणारे नाना उर्फ भाऊलाल भास्कर कोळी (40) विकास जलाल तडवी (29) तर एक मयत मुक्तार तडवी सार्वे हे जागीच ठार झाले. जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये युनुस अल्लारखाँ तडवी, चंदन हरीश खाटीक, समाधान नारायण पाटील यांच्यासह इतर गंभीर जखमी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.