Jallianwala Bagh : १३ एप्रिल; आजच्याच दिवशी केले होते रानटी इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड

304
Jallianwala Bagh : १३ एप्रिल; आजच्याच दिवशी केले होते रानटी इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड...
Jallianwala Bagh : १३ एप्रिल; आजच्याच दिवशी केले होते रानटी इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड...
इंग्रजांविषयी बोलताना आपण इंग्रज हे न्यायप्रिय होते, लोकशाही मानणारे होते असे म्हणतो. परंतु हे चुकीचे आहे. मुघलांप्रमाणे इंग्रजही रानटी होते, अत्याचारी होते. मात्र १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर शस्त्राने हिंदुंवर विजय मिळवता येणार नाही, हे त्यांना कळून चुकले म्हणून लोकशाही आणण्याचे ढोंग त्यांनी केले. त्यानंतरही लोकशाही या गोंडव नावाखाली ते भारतीयांवर अत्याचार करतच होते. (Jallianwala Bagh)
इंग्रजांच्या अत्याचारांपैकी एक मोठे हत्याकांड म्हणजे जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) हत्याकांड… पंजाबमधील जालियनवाला बागेत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा उद्देश ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक निषेध नोंदवणे हा होता, परंतु ब्रिटिश जनरल डायरने क्रूरतेची परिसीमा ओलांडली. आजही जालियनवाला बाग हा ब्रिटिश सरकारच्या भीषण अत्याचाराचा प्रत्यक्ष पुरावा आहे. (Jallianwala Bagh)
१३ एप्रिल १९१९ हा बैसाखीचा दिवस होता. बैसाखी हा संपूर्ण भारतातील प्रमुख सण असला तरी, विशेषतः पंजाब आणि हरियाणातील शेतकरी हिवाळी रब्बी पीक कापणीनंतर नवीन वर्ष साजरे करतात. विशेष म्हणजे १३ एप्रिल १६९९ मध्ये दहावे आणि शेवटचे गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. म्हणूनच बैसाखी हा पंजाब आणि आसपासच्या राज्यांचा सर्वात मोठा सण आहे. (Jallianwala Bagh)
त्या दिवशी, अमृतसरमध्ये शेकडो वर्षांपासून एक जत्रा भरत होती, ज्यामध्ये ५०० मीटर अंतरावर असलेल्या श्री हरमिंदर साहिब गुरुद्वारामध्ये गुरूजींचे दर्शन घेण्यासाठी आणि बैसाखीचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक दूर-दूरवरून अमृतसरला पोहोचले होते. गुरुद्वारापासून दूर जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) पाहण्यासाठी अनेक मुले, महिला, वृद्ध लोक जमले होते आणि मोठ्या आनंदात बैसाखीचा सण साजरा करत होते. (Jallianwala Bagh)
पहिल्या महायुद्धात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कारवाया रोखण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतात अनेक कडक कायदे आणले होते. अराजकीय आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा, १९१९ (रॉलेट कायदा) ब्रिटिशांनी १० मार्च १९१९ रोजी पारित केला. या कायद्याला काळा कायदा असेही म्हणतात. हा कायदा अंमलात आणल्यानंतर ब्रिटिश सरकार क्रांतिकारकांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकू शकत होते. (Jallianwala Bagh)
तर डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेविरोधात आणि रॉलेट कायद्याच्या विरोधात १३ एप्रिलला बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बाग येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या शांततापूर्ण सभेला हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरुष आणि लहान मुले जमली होती. दरम्यान, ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर आपल्या सैनिकांसह सभेच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने संपूर्ण जालियनवाला बागला वेढा घातला. जनरल डायरने कोणताही इशारा न देता बाहेरचा एकमेव मार्ग बंद केला आणि आपल्या सैनिकांना आंदोलकांवर गोळीबार करण्यास सांगितले. या अंदाधुंद गोळीबारात शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला. (Jallianwala Bagh)
१००० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले, २००० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. त्यामुळे १३ एप्रिल हा खरंतर काळा दिवस आहे. इंग्रजांनी केलेल्या जुलुमाची साक्ष देणारा हा दिवस आहे. (Jallianwala Bagh)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.