जेम्स पार्किंसन्स (James Parkinson) हे एक सर्जन, अपेथोकरी, भूवैज्ञानिक, पॅलेओन्टोलॉजिस्ट आणि राजकीय नेते होते. १८१७ साली त्यांनी पहिल्यांदा पॅरालिसीस विषयी सखोल माहिती दिली होती. त्यामुळे लोक त्यांना ओळखू लागले होते. जेम्स पार्किंसन्स यांचा जन्म ११ एप्रिल १७५५ साली लंडन येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव जॉन पार्किंसन्स असं होतं. ते सुद्धा शल्यचिकित्सक होते. जेम्स यांनी आपल्या लग्नानंतर लगेचच आपल्या वडिलांसोबत शल्यचिकित्सेचा सराव करायला सुरुवात केली.
पार्किंसन्स (James Parkinson) यांना त्यांच्या मेडिकल क्षेत्राव्यतिरिक्त भूगर्भशास्त्र, जीवाश्मविज्ञान आणि त्या काळात सुरू असलेल्या पॉलिटिक्स मध्येही रस होता. ते वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यांच्या न्यायासाठी लढणारे सक्षम वकील म्हणून पार्किंसन्स नेहमी उभे राहायचे. ते त्या काळच्या पिट सरकारचे विरोधक होते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक सामाजिक कारणांमुळे गुंतागुंत झालेली होती.
फ्रेंच क्रांतीचे कट्टर समर्थक
काही इतिहासकारांना वाटते की पार्किंसन्स (James Parkinson) हे फ्रेंच क्रांतीचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आपल्या मुलाला त्याने केलेल्या अपेंडीसायटीसच्या पहिल्या केसच्या नोंदी लिहिण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्या नोंदींमध्ये आतड्याला छिद्र पडल्यामुळे मृत्यू झाला असा निष्कर्ष लिहिण्यात आला. पार्किंसन्स (James Parkinson) यांनी ब्रिटनमध्ये राजकीय अनागोंदी सुरू असताना म्हणजेच फ्रेंच क्रांती झाल्यानंतरच्या काळात राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकणाऱ्या २० पत्रिका प्रकाशित केल्या. काही पत्रिका त्यांनी स्वतःच्या खऱ्या नावाने प्रकाशित केल्या, तर काही ओल्ड ह्युबर्ट या नावाने प्रकाशित केल्या. त्या सगळ्या पत्रिकांमध्ये त्यांनी सार्वत्रिक मताधिकाराची मागणी आणि मूलगामी सामाजिक सुधारणा ह्या गोष्टींची मागणी केली होती. पार्किंसन्स यांना लोकांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांचे राहणीमान सुधारावे असे वाटायचे.
Join Our WhatsApp Community