James Watt : शक्तीला वॅट का म्हणतात? कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावरुन हे नाव पडलं?

वॅट यांनी आधीच्या इंजिपेक्षा अधिक चांगले म्हणजेचे वाफेचे इंजिन बनवले. औद्योगिक क्रांतीच्या काळात हा महत्वाचा शोध मानला जातो. त्यांनी होकायंत्र, दाबमापक अशी उपकरणे तयार केली. त्यांनी वाफेचे इंजिन बनवल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आणि हॉर्सपॉवर ही संकल्पना उदयास आली.

327
James Watt : शक्तीला वॅट का म्हणतात? कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावरुन हे नाव पडलं?

आज आम्ही तुम्हाला अशा शास्त्रज्ञाची ओळख करुन देणार आहे ज्यांनी हॉर्सपॉवर ही संकल्पना मांडली. आज आपण हॉर्सपॉवर हा शब्द सर्रास वापरतो. मात्र ही संकल्पना एका शस्त्रज्ञाने निर्माण केली होती. त्यांच्या नावावरुन आपण शक्तीला Watt हे एकक वापरतो. त्यांचं नाव आहे महान शास्त्रज्ञ जेम्स वॅट (James Watt).

(हेही वाचा – Coaching Centers : कोचिंग क्लासमध्ये १६ वर्षांनंतरच मिळणार प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केली नवीन मार्गदर्शकतत्वे)

जेम्स वॅट (James Watt) हे स्कॉटिश संशोधक, यांत्रिक अभियंता आणि रसायनशास्त्रज्ञ होते. जेम्स वॅटचा जन्म १९ जानेवारी १७३६ रोजी ग्रीनॉक येथे झाला. त्यांचे वडील जहाजचालक, जहाजाचे मालक आणि कंत्राटदार होते. जेम्स यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. त्यानंतर ते लॅटिन, ग्रीक व गणित या विषयासाठी शाळेत जाऊ लागले. त्यांना इंजिनची ओळख वडिलांमुळे झाली. वडिलांच्या जहाजाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी त्याबाबतच्या उपकरणांची माहिती मिळवली. (James Watt)

(हेही वाचा – Ram Lalla Idol First Photo : राम मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचा पहिला फोटो वायरल)

पुढे वॅट (James Watt) यांनी आधीच्या इंजिपेक्षा अधिक चांगले म्हणजेचे वाफेचे इंजिन बनवले. औद्योगिक क्रांतीच्या काळात हा महत्वाचा शोध मानला जातो. त्यांनी होकायंत्र, दाबमापक अशी उपकरणे तयार केली. त्यांनी वाफेचे इंजिन बनवल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आणि हॉर्सपॉवर ही संकल्पना उदयास आली. वाफेच्या इंजिनाचा वापर गिरण्या, भट्ट्या, पाणी पुरवठा उत्यादी गोष्टींसाठी होऊ लागला. म्हणूनच शक्तीला वॅट (James Watt) हे एकक पुढे सहज वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीमध्ये वॅट यांचे योगदान मोठे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.