उत्तर काश्मीरमधील (Jammu and Kashmir) एलओसीजवळ उरी (बारामुल्ला) सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ३ जिहादी दहशतवादी ठार झाले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार उरीमध्ये ३ दहशतवादी लपले होते, त्यापैकी पहिले दोघे मारले गेले. त्याच वेळी, आता तिसरा दहशतवाद्याचा (Jammu and Kashmir) देखील खात्मा करण्यात आला आहे. चकमकीच्या ठिकाणी अजूनही शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू होती. यावेळी सुरक्षा दलांना आपल्या दिशेने येताना पाहून जिहादी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांच्या घेऱ्यात अडकलेले दहशतवादी नुकतेच भारतीय (Jammu and Kashmir) हद्दीत घुसले होते की पूर्वीपासूनच दडून बसले होते हे स्पष्ट झालेले नाही. हातलंगा या गावाच्या हद्दीत ही चकमक सुरू आहे. या परिसरात घनदाट जंगल, नाला आणि काही रिकामी घरेही आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना काल (शुक्रवार १५ सप्टेंबर) रात्री त्यांच्या यंत्रणेकडून कळले की हथलंगाजवळ दहशतवाद्यांचा एक गट दिसला होता.
(हेही वाचा – Jammu Kashmir : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार)
या घटनेची माहिती मिळताच (Jammu and Kashmir) पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त टास्क फोर्सने परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. आज (शनिवार, १६ सप्टेंबर) पहाटे, शोधकार्यादरम्यान सैनिक पुढे जात असताना दहशतवाद्यांनी गराडा तोडला आणि पळून जाण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार केला. सैनिकांनीही आपली पोझिशन घेतली आणि प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी (Jammu and Kashmir) सैनिकांवर रायफल ग्रेनेड आणि यूबीजीएल गोळीबारही केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community