जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुंछ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी सुरक्षा दलांनी ४ स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या चौघांवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
जिहादी दहशतवाद्यांचा सैन्याच्या तुकडीवर हल्ला
पाकिस्तानची जिहादी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी (Jammu and Kashmir) संबंधित एँटी फॅसीस फ्रंट नामक दहशतवादी टोळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेरा की गली भागात दबा धरून बसली होती. (अँबुश) यापरिसरात सैन्याची तुकडी शोध मोहीम राबवत असताना सुरनकोट भागातील डेरा की गली व बुफलियाज यादरम्यान वळणावर जिहादी दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर या परिसरात चकमक सुरू झाली. यात ७ जवानांना गोळ्या लागल्या.
(हेही वाचा – Deep Cleaning Drive : फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकायदा पार्किंगवर कारवाई)
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू –
चकमकीच्या ठिकाणी योग्य पोजीशन घेण्यासाठी जवानांना सरकावे लागले. यावेळी हुतात्मा झालेल्या २ जवानांच्या मृतदेहांची जिहादी दहशतवाद्यांनी विटंबना केली. या हल्ल्यानंतर ‘डेरा की गली’ घनदाट जंगलात (Jammu and Kashmir) गुरुवारी (२१ डिसेंबर) रात्रीपासून सैन्याचे जवान शोध मोहीम राबवत आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
(हेही वाचा – Ajit pawar : संभ्रम नको, मी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही- अजित पवार)
ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून पाळत –
घनदाट जंगलात (Jammu and Kashmir) जमिनीवर शोध घेण्याबरोबरच हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून पाळत ठेवली जात आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांची मदत केली असा संशय पोलीस आणि तपास यंत्रणेला आहे. सुरक्षा दलांनी ४ स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान सैन्याच्या १६ व्या कोरच्या जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान जिहादी दहशतवाद्यांचा (Jammu and Kashmir) शोध घेण्यासाठी या परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community