धक्कादायक! जम्मू -काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या

140

जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांनी त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार आहे. पोलिसांकडून या मदतनीसाचा शोध सुरु आहे.

हेमंत लोहिया यांचा मृतदेह शहराबाहेरील निवासस्थानी आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. लोहिया यांच्या घरातील मदतनीस फरार आहे. त्याच्या शोधासाठी काही पथके तयार करण्यात आली आहेत.

( हेही वाचा: मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या )

जम्मू- काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर

लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेक-याने लोहिया यांना गुदमरुन ठार केले. त्यानंतर केचअपच्या बाॅटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा तपास सुरु असून, घटनास्थळाची वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत लोहिया यांच्या हत्येची माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर आले. गुप्तचर यंत्रणादेखील सतर्क झालया आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.