जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) काल म्हणजेच गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी ८ फरार जिहादी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे जिहादी दहशतवादी तीन दशकांपासून लपून बसले होते, पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु होता. अखेर त्यांना पकडण्यात जम्मू कश्मीर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये (Jammu Kashmir Police) आदिल फारुख फरीदी (सरकारी कर्मचारी), मोहम्मद इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक हुसैन, इश्तियाक अहमद देव, एजाज अहमद, जमील अहमद आणि इश्फाक अहमद यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अपहरण आणि खुनासह विविध गुन्ह्यांचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी सरकारी रोजगा आणि काँट्रॅक्टही मिळवले होते, तर काही जण खासगी व्यवसायात गुंतलेले आढळले. तसेच उर्वरित काही न्यायिक न्यायालयात काम करताना आढळून आले. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राज्य तपास यंत्रणा (एसआयए) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) संयुक्त पथकाच्या नेतृत्वाखालील एका केंद्रित ऑपरेशनचा भाग म्हणून ही अटक करण्यात आली.
(हेही वाचा – Rule Change : देशात 1 सप्टेंबर पासून होणार ‘हे 11’ मोठे बदल)
जम्मू आणि कश्मीर पोलीस (Jammu Kashmir Police) सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले दहशतवादी आणि त्यांचे दहशतवादी साथीदार मोठ्या दहशतवादी कारवायांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते आणि त्यांच्यावर जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप किंवा टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, जम्मूच्या टाडा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community