जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि त्यांचे प्रयत्न हानून पाडण्याच्या दिशेने सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा पूर्णतः नायनाट करण्याच्या उद्देशाने आणि त्यांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याची योजना आहे. यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठीही ठोस पावले उचलली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरी खोऱ्यात दहशतवादाविरोधातील ऑपरेशन अधिक प्रभावी करण्यासोबतच त्याच्या धोक्यांचा सामना करण्याच्या रणनीतीवरही काम सुरू आहे. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंगला आळा घालण्यासाठी आणि लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. दरम्यान, यावेळी मोठ्या प्रमाणावर कामगार पकडले गेले आहेत. सीआरपीएफच्या अतिरिक्त ३० तुकड्या आणि बीएसएफच्या २५ तुकड्या खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – पन्नास लाख इनामी नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता ठार!)
सुसज्ज आधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार
असेही सांगितले जात आहे की, काश्मीरी खोऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज आधुनिक कॅमेरे बसवण्यात येत आहेत. गर्दीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहे. त्याची सुरुवात श्रीनगरपासून करण्यात आली आहे. सुरक्षा दलांच्या सक्रियतेमुळे दहशतवादी मारले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पकडण्यात यश येत आहे. असे असतानाही ते जीव मुठीत घेऊन दहशतवाद्यांच्या कारवाया एकामागे एक अशा सुरूच आहे.