जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील पूंछ येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. सोमवार १७ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता सुरु झालेली ही चकमक पहाटेपर्यंत सुरु होती.
पोलिस आणि सैन्याच्या (Jammu Kashmir) या संयुक्त मोहिमेबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, रात्रभर सुरू असलेल्या गोळीबारात चारही अतिरेकी मारले गेले. मात्र, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याकडून चार एके रायफल, दोन पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.यापूर्वी सोमवारी पहाटे, पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडत २ घुसखोरांना ठार केले होते. त्यामुळे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची एकूण संख्या ही ६ वर गेली आहे.
(हेही वाचा – Conversion : तरुणीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करणाऱ्या तरुणाला अटक)
घटनास्थळावरून एका मॅगझिनसह एक एके ४७, रायफल, ११ राउंड आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, घुसखोरीचा पुंछ (Jammu Kashmir) जिल्ह्यातील शांतता भंग करण्याच्या उद्देश होता.
यापूर्वी २४ जून रोजी, कृष्णा घाटी भागात नियंत्रण रेषेवर ३ जिहादी दहशतवाद्यांना (Jammu Kashmir) गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याआधी देखील सुरक्षा दलाने घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला होता आणि पूंछमधून इतर गोष्टींसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. घुसखोरी करणारे अतिरेकी मात्र एके ४७ रायफल, स्टील कोअर बुलेटसह इतर गोष्टींसह दारूगोळा सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community