Jammu Kashmir Earthquake: जम्मू काश्मीरमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

197

जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का (Earthquake) बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटर येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी 5.01 वाजेच्या सुमारास भूकंपाचा झटका बसला. एएनआय वृत्तसंस्थेने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, ही माहिती दिली गेली आहे.

3.6 रिश्टर सेक्लचा भूकंप

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कटराच्या पूर्वेपासून 97 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे 5.1 वाजता भूकंप झाला. महिनाभरापूर्वीही डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

( हेही वाचा: Income Tax Raid: आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे नेमके काय करतो? जाणून घ्या सविस्तर )

जम्मू काश्मीरमध्ये आधीही जाणवले भूकंपाचे धक्के

काही दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. रविवारी 8 जानेवारी रोजी रात्री 11.15 सुमारास भूकंप झाला होता. यापूर्वी 5 जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.