जम्मू- कश्मीरमध्ये हिंदू कुटुंबांवर दहशतवादी हल्ला; 4 जणांचा मृत्यू, तर 9 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले आहे. जम्मूमधील राजौरीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या डांगरी गावात दहशतवाद्यांनी हिंदू कुटुंबांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार हिंदू ठार झाले आहेत, तर नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना एअरलिफ्ट करून जम्मू जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

( हेही वाचा: विद्याधर गोखले यांची संस्कृतनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा )

मृतांची नावे 

  • दीपक कुमार (23),
  • माजी सैनिक सतीश कुमार (45),
  • शिवपाल उर्फ ​​आशिष कुमार (32)
  • आणि प्रीतम लाल (56, रा. डांगरी) हे दहशतवादी हल्ल्यात ठार झाले.

दहशतवाद्यांनी ज्या लोकांना लक्ष्य केले आहे ते सर्वजण  नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सनातन धर्मसभेसह अनेक संघटनांनी राजौरी बंदची घोषणा केली आहे. सनातन धर्मसभेचे अध्यक्ष राजू दत्ता म्हणाले की, हिंदूंना लक्ष्य केले जात असून हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश शर्मा यांनीही सोमवारी राजौरी बंदची घोषणा केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी राजोरी रुग्णालयात निदर्शनेदेखील केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here