जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून, त्या एकापाठोपाठ एक काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. याच कारणामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच सुरक्षा दल अनेक संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र करून दहशतवाद्यांचा खात्मा करत असल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी जम्मू आणि काश्मीर पोलिसांना अनंतनाग मोठे यश मिळाले. अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम) चा कमांडर ठार झाला. चकमक झाल्यानंतर पोलिसांनी अशी माहिती दिली की, त्यांनी दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल आणि इतर अनेक शस्त्रे आणि दारूगोळा ताब्यात घेतला आहे.
(हेही वाचा – शिवसेनेने सोमवारी बोलावली आमदारांची बैठक, सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या हालचाली)
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर ठार
सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर निसार खांडे मारला गेला. त्याच्याकडून एके 47 रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या, ऑपरेशन चालू आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.
शोध मोहिमेदरम्यान चकमक
शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांना अनंतनागच्या ऋषीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांसह लष्कर आणि सीआरपीएफने परिसराला घेरून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक कमांडर मारला गेला.
Join Our WhatsApp Community