हिजबुलच्या दहशतवाद्याला बंगळुरूत अटक

हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेच्या जिहादी दहशतवाद्याला कर्नाटकच्या बंगळुरू येथे अटक करण्यात आली. तालिब हुसैन असे दहशतवाद्याचे नाव असून तो पत्नी आणि मुलांसह काश्मीर सोडून पळाला होता.

मशिदीत घेतला होता आश्रय

जिहादी दहशतवादी तालिब हुसैल याला जम्मू-काश्मीर आणि बंगळुरू शहर पोलिसांनी रविवारी अटक केली होती. यासंदर्भात तालिबच्या प्राथमिक चौकशीनंतर मंगळवारी सुरक्षा दलाने त्याच्या अटकेची माहिती दिली. यासोबतच कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्या कार्यालयानेदेखील हिजबुलच्या दहशतवाद्याला बंगळुरूतून अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब हुसैन पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता. सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली होती. तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता. तालिबने श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता आणि तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी उपस्थितांना संबोधित करत असे.

( हेही वाचा:राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here