Jammu Kashmir: नाॅर्कोटिक्स टेररिझम माॅड्यूलच्या प्रमुख ऑपरेटरला NAI कडून अटक

155

NIA ने सोमवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातून पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा द्वारे चालवल्या जाणा-या नार्कोटिक्स- टेररिझम माॅड्यूलच्या प्रमुख ऑपरेटरला अटक केली आहे. फेडरल एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 45 वर्षीय अब्दुल रौफ बदन, जो तंगधरमधील कर्नाहच्या अमरोही गावचा रहिवासी आहे. हा 2020 मध्ये झालेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला 12 वा आरोपी आहे.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अमरोही येथील नियंत्रण रेषेवरुन भाजीपाल्यांनी भरलेल्या वाहनांमध्ये लपून अमली पदार्थ, रोख रक्कम, शस्त्रे आणि दारुगोळा पुरवल्याबद्दल बदनला अटक करण्यात आली होती. तो लष्कर-ए- तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या माॅड्यूलचा मुख्य ऑपरेटर आहे, जो पाकिस्तानी मास्टर्सच्या इशा-यावर काम करत होता.

( हेही वाचा: पंतप्रधान होण्याच्या मुद्यावर शरद पवार म्हणतात, मी ८२ वर्षांचा… )

11 आरोपींविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल

NIA च्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला अब्दुल रौफ बदन हा तंगधर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर ठिकाणी पाकिस्तानी हॅंडलवरुन अंमली पदार्थ गोळा करत असे आणि या प्रकरणातील इतर आरोपींना देत असे. 11 जून 2020 रोजी कुपवाडा येथील हंदवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचवर्षी 23 जून एनआयएने त्याची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणातील 11 आरोपींविरुद्ध एजन्सीने यापूर्वीच जम्मू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.