Jammu kashmir: लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी अटकेत, घुसखोरीचा कट उधळला

118

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा आणि सीमेवर दहशतवादी घटना घडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराने दोन दहशवाद्यांना अटक केली. तर मंगळवारी सोपोर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तोयबाच्या एका हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडबल्यूला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या हायब्रीड दहशवादी आणि ओजीडब्ल्यूची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे.

( हेही वाचा: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर गुन्हा दाखल; 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप )

पोलिसांनी ट्वीट करत दिली माहिती

पोलिसांनी ट्वीट करुन दहशतवाद्याच्या अटकेची माहिती दिली होती. काश्मीर पोलिसांनी लिहिले, बांदीपोरा पोलीस आणि लष्कराने 1 दहशतवादी इम्तियाज बेग इन्ना भाई, मोहल्ला फतेहपोरा, बारामुल्ला येथील रहिवासी याला अटक केली. त्याला एक AK-47 रायफल, दोन एके मॅगझिन आणि 59 एके राऊंडसह अटक करण्यात आली. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.