Jamsetji Tata : टाटा समूहाचे संस्थापक महान उद्योजक जमशेदजी टाटा

जमशेदजी टाटा यांचा जन्म १८३९ मध्ये गुजरातमधील नवसारी या छोट्याशा गावात झाला.

353
Jamsetji Tata : टाटा समूहाचे संस्थापक महान उद्योजक जमशेदजी टाटा
Jamsetji Tata : टाटा समूहाचे संस्थापक महान उद्योजक जमशेदजी टाटा

जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचा जन्म १८३९ मध्ये गुजरातमधील नवसारी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नौशेरवांजी आणि आईचे नाव जीवनबाई टाटा असे होते. नौशेरवानजी हे पारशी धर्मगुरूंच्या कुटुंबातील पहिले व्यापारी होते. जमशेदजींनी वयाच्या १४ व्या वर्षीच आपल्या वडिलांच्या उद्योगात हातभार लावायला सुरुवात केली. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षण घेत असतानाच त्यांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. १८५८ मध्ये ते पदवीधर झाले आणि त्यांनी स्वतःला वडिलांच्या व्यवसायात झोकून दिले.

जमशेदजी यांनी वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत वडिलांसोबत काम केले. १८६८ मध्ये त्यांनी २१००० रुपये गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी दिवाळखोर झालेला तेल कारखाना विकत घेतला आणि तिथे कापूस कारखाना उघडना. अलेक्झांडर मिल असे याचे नामकरण करण्यात आले. दोन वर्षांनंतर त्यांनी मोठ्या नफ्याने विकले. या पैशातून त्यांनी १८७४ मध्ये नागपुरात कापसाचा कारखाना काढला. एम्प्रेस मिल असे या कारख्यान्याचे नामकरण करण्यात आले.

(हेही वाचा – Aditya Thackeray : अनंत अंबानींच्या प्री वेडिंग कार्यक्रमात आदित्य ठाकरे त्यांच्या ड्रेसवरून होत आहेत ट्रोल…)

तो असा काळ होता जेव्हा इंग्रजांची दडपशाही चालायची आणि टाटा कुटुंब हे लहान व्यावसायिक होते. एम्प्रेस मिल ही त्यांची पहिली मोठी औद्योगिक कंपनी होती. जमशेदजींनी नागपुरात सूतगिरणी उभारण्याची घोषणा केली तेव्हा मुंबईला कापड शहर म्हटले जात होते. बहुतेक कापूस गिरण्या फक्त मुंबईत होत्या. त्यामुळेच जमशेटजींनी नागपूरची निवड केली तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यात आली. खरेतर नागपूरात कापसाचे उत्पादन होते आणि रेल्वे जंक्शन जवळ होते आणि पाणी व इंधनाचा मुबलक पुरवठा होता. म्हणूनच त्यांनी नागपूरची निवड केली. यावरुन लक्षात येतं की जमशेदजींनी औद्योगिक दृष्टी तीक्ष्ण होती.

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड म्हणजेच आताची टाटा स्टील किंवा टिस्को ही भारतातील एक प्रमुख पोलाद कंपनी आहे. जमशेदपूर येथे असलेल्या या कारखान्याची स्थापना १९०७ मध्ये झाली. २८ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमता असलेली ही जगातील पाचवी सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. आज टाटा समूह प्रचंड मोठा समूह आहे. जुने आणि मोठे व्यावसायिक असण्यासोबतच त्यांची विश्वासार्हता खूप मोठी आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्याकडे लोक आदराने पाहतात. आणि या टाटा समूहाचे संस्थापक आहे जमशेदजी टाटा. (Jamsetji Tata)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.