‘या’ कामासाठी गेला होता जान मोहम्मद दुबईला!

जान मोहम्मद शेख हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून बहरीनला गेला होता.

139

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला मुंबईचा संशयित दहशतवादी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया याने २०१९ मध्ये दोन वेळा विदेश प्रवास केला आहे. या दोन भेटी दरम्यान, तो एकदा बहरीनला गेला होता आणि दुसऱ्यांदा दुबईला गेला होता. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना जान मोहम्मदच्या या दोन विदेश प्रवासाची माहिती होती, परंतु त्या काळात तो कोणत्या दहशतवादी कारवायांसाठी जात आहे, याची त्यांना माहिती मिळाली नव्हती.

दाऊदने त्याला ‘ही’ दिलेली जबाबदारी!

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद शेख हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून बहरीनला गेला होता आणि दाऊदने त्याला अली बुदेशच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र दुबईमधील अली बुदेश याचे वजन बघून तो काम न करता तसाच भारतात परतला होता. जान मोहम्मद शेखने बहरीनला जाऊन अली बुदेश राहत असलेल्या ठिकाणीची रेकी देखील केली होती, मात्र अली बुदेश ही दुबईतील मोठी व्यक्ती असून तिची हत्या केली, तर आपण भारतात जिवंत येऊ शकत नाही, या भीतीने त्याने हत्येचा बेत रद्द करून तो भारतात परतला होता.

(हेही वाचा : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘ही’ होती ठिकाणे!)

कोण आहे अली बुदेश? 

अली बुदेश हा पूर्वी दाऊदसाठी काम करायचा. दाऊद हा त्या वेळी अली बुदेशचे नेटवर्क वापरूनच दुबईत पोहचला होता, मात्र  काही वर्षांनी दाऊद आणि अली बुदेश यांच्यातील असलेले संबंध बिघडले आणि अली बुदेश याने पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदच्या शत्रूंशी हात मिळवणी केली. अली बुदेशने आंतरराष्ट्रीय पोलिसांना दाऊदशी संबंधित अनेक माहिती पुरवली होती, म्हणून दाऊदने त्याला मारण्याचे कंत्राट छोटा शकीलला दिले होते. नंतर छोटा शकीलने फहीम मचमचकडे ही जबाबदारी सोपवली होती. फहीम मचमचने या कामासाठी  जान मोहम्मद शेखला याची निवड करून त्याला दुबईत पाठवले होते, त्यासाठी फहिम मचमच याने पाकिस्तानमधून जान मोहमद याला आर्थिक रसद पुरवली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.