हवी होती माफी पण खावी लागली पोलिसांची लाठी!

164

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयात वीज बिल माफीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी फरफटत नेले आहे. शेतात काम करण्याचे औजार म्हणजे रुमणं घेऊन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आले होते. पण निवेदन देण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलीस परवानगी नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः फरफटत नेले.

पोलिसांनी शेतकऱ्यांचा एक शब्दही न ऐकता घेतले ताब्यात

प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आंदोलन झाले, पण पोलिसांनी शेतकऱ्यांचा एक शब्दही न ऐकता त्यांना ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना उसाची बिल देखील साखर कारखानदार वेळेवर देत नाहीत. शेतकरी भयानक संकटात आहेत. अशा संकटावेळी महावितरण मात्र सक्तीची वीज बिल वसुली करत आहेत. लॉकडाऊन, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल असताना सक्तीची वीज बिल वसुली थांबवा आणि संपूर्ण वीज बिल माफ करा, अशी मागणी करत जनहित शेतकरी संघटनेने हातात रुमणं घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – मुंबईकरांना तब्बल १० हजार चौरस फुटांचे मिळाले ‘हे’ पर्यटन स्थळ!)

निवडणुकीत दिलेला शब्द पाळा अन्यथा राजीनामा द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांनी निवडणुकीत वेगवेगळे आश्वासने देत सत्तेवर येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या नेत्यांनी शेतकऱ्यांची वीज बिलं शंभर टक्के माफ करू असे आश्वासन दिले होते. निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.