Spicejet Flight: धक्कादायक; प्रवाशाने केला हवाई सुंदरीचा विनयभंग; व्हिडीओ व्हायरल

मागच्या काही दिवसांपूर्वी विमानातील लघुशंका कांड चर्चेत आले होते. त्यानंतर विमानातील अनेक धक्कादायक कृत्य, व्हिडीओ, विमानातील मारामा-या समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. व्हायरल होणा-या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती हवाई सुंदरीवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. ती हवाई सुदंरी सारखी काहीतरी म्हणतेय आणि रडतेय पण तो प्रवासी हवाई सुदंरीसोबत हुज्जत घालत होता. ही घटना दिल्लीहून हैदराबादला जाणा-या स्पाइस जेटच्या विमानात सोमवारी 23 जानेवारीला घडली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

( हेही वाचा: ‘वंदे मातरम्’: कादंबरीतील कविता ‘अशी’ बनली भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ )

..तरीही तो तिच्यावर ओरडत होता

व्हायरल होणा-या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती हवाई सुदंरी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसते आहे. ती हवाई सुंदरी रडत होती, तरीही तो थांबला नाही तो हुज्जत घातलच राहिला. या दोघांमधील वाद ऐकून विमानातील इतर प्रवाशीदेखील तिथे आले. पण ती वृद्ध व्यक्ती जोर जोरात ओरडतच होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध प्रवाशाने हवाई सुदंरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना इतर क्रू मेंबरला कळल्यानंतर एका हवाई सुंदरीने वृद्ध प्रवाशाला जाब विचारल्यावर विमानात गोंधळ झाला. या घटनेनंतर त्या प्रवाशाला आणि त्याच्या सोबतच्या सहप्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले. दरम्यान, हा निव्वळ अपघात होता, असा दावा अन्य काही प्रवाशांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here