हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट म्हणून जपान आणि सिंगापूर या देशांनी बाजी मारली आहे. या यादीत भारत 90व्या क्रमांकावर आहे. हेनले पासपोर्ट रँकिंग ही इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) द्वारे प्रदान केलेल्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे.
कशी दिली जाते रँकिंग
रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अनुक्रमे जपान आणि सिंगापूर आहेत. केवळ पासपोर्टसह या देशाच्या नागरिकांना 192 देशांत व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी आहे. प्रत्येक नियोजित स्थानासाठी प्रवास करताना, जर व्हिसाची आवश्यकता नसेल, तर त्या पासपोर्टला रँकिंगमध्ये एक गुण दिला जातो. पण जिथे प्रत्येक देशात जाण्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते वा इलेक्ट्रॅानिक व्हिसासाठी अर्ज करावा लागतो, तेथे शून्य गुण दिले जातात.
(हेही वाचाः भारताच्या ‘डोस’नंतर ब्रिटन सुधारले! घेतला मोठा निर्णय)
भारताची घसरण
जपान आणि सिंगापूर हे दोन देश पहिल्या तर दक्षिण कोरिया आणि जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहेत. युरोपियन देश ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह टॉप 10 मध्ये आहेत. अफगाणिस्तान, इराक, सीरिया, पाकिस्तान आणि येमेन हे या यादीत मागे आहेत. गेल्या वर्षी 84 व्या क्रमांकावर असलेला भारत 90व्या स्थानावर घसरला असून, त्याच्या पासपोर्टधारकांना 58 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ताजिकिस्तान आणि बुर्किना फासोसह भारताचा या क्रमवारीत समावेश आहे.
टॅाप 10 पासपोर्ट
1. जपान, सिंगापूर (स्कोअर: 192)
2. जर्मनी, दक्षिण कोरिया (स्कोअर: 190)
3. फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन (स्कोअर: 189)
4. ऑस्ट्रिया, डेन्मार्क (स्कोअर: 188)
5. फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड, पोर्तुगाल, स्वीडन (स्कोअर: 187)
6. बेल्जियम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड (स्कोअर: 186)
7. झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे, यूके, यूएस (स्कोअर: 185)
8. ऑस्ट्रेलिया, कॅनडा (स्कोअर: 184)
9. हंगेरी (स्कोअर: 183)
10. लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया (स्कोअर: 182)
(हेही वाचाः भारतात इंधन ‘पेटले’, म्हणून भारतीय ‘या’ देशात पळत ‘सुटले’! मिळतंय स्वस्त इंधन)
फ्लॉप 10 पासपोर्ट
1. इराण, लेबनॉन, श्रीलंका, सुदान (स्कोअर: 41)
2. बांगलादेश, कोसोवो, लिबिया (स्कोअर: 40)
3. उत्तर कोरिया (स्कोअर: 39)
4. नेपाळ, पॅलेस्टिनी प्रदेश (स्कोअर: 37)
5. सोमालिया (स्कोअर: 34)
6. येमेन (स्कोअर: 33)
7. पाकिस्तान (स्कोअर: 31)
8. सिरिया (स्कोअर: 29)
9. इराक (स्कोअर: 28)
10. अफगाणिस्तान (स्कोअर: 26)