जया बच्चन यांना कोरोनाची लागण!

113

अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट ”रॉकी और रानी की प्रेम कहानी” मध्ये जया बच्चन झळकणार आहेत. मात्र, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रीकरणाला स्थगिती

याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता जया बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, करण जोहरने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. करणने गेल्या वर्षी ”रॉकी और रानी की प्रेम कहानी” या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

( हेही वाचा :10.68 कोटींचा जीएसटी बुडवण्यासाठी दिल्या बनावट पावत्या )

तिसरी लाट ओसरतेय

भारतात कोरोनाची तिसरी लाट सातत्याने कमजोर होत आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 49 हजार 394 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत 13% कमी आहे. यादरम्यान 2 लाख 46 हजार 674 रुग्ण बरे झाले असून, मृतांची संख्या 1 हजार 72 झाली आहे. सध्या देशात 14 लाख 35 हजार 569 सक्रिय प्रकरणे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.