- ऋजुता लुकतुके
जीप कंपनीने या कॉम्पॅक्ट एसयुव्हीची घोषणा पहिल्यांदा २०१९ मध्ये केली होती.(Jeep Sub-4m SUV)
भारतात सध्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारचा जमाना आहे. त्यामुळे असेल कदाचित जीप कंपनीने यापूर्वी मागे ठेवलेला कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा प्रकल्प पुन्हा सुरू करायचं ठरवलं आहे. जीप सब-४एम ही एसयुव्ही भारतात लाँच करणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीच्या कॉमन मॉड्युलर प्लॅटफॉर्मवरचीच ही नवीन गाडी असेल असा अंदाज आहे.(Jeep Sub-4m SUV)
मिड-साईझ किंवा प्रिमिअम हॅचबॅक पद्धतीच्या कारच्या आकाराची ही एसयुव्ही असेल असा अंदाज आहे. जीपच्या युरोपीयन बाजारातील गाड्या सध्या १ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरतात. या इंजिनाची क्षमता १२० पीएस इतकी आहे. सब-४एम एसयुव्हीमध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रेल इंजिन असेल अशी शक्यता आहे. शिवाय प्लग-इन हायब्रिड पॉवर ट्रेनची सुविधाही असेल.(Jeep Sub-4m SUV)
(हेही वाचा – Ulfa Peace Deal : आसाममधील फुटीरतावादी कारवायांना चाप लावणार ?; सरकारने उचलले मोठे पाऊल)
Jeep Renegade sub 4m SUV rendered – Too good to not be real one day https://t.co/f6tQSk2fBO pic.twitter.com/2mRSUzZMJ4
— RushLane (@rushlane) March 3, 2020
सब ४एम एसयुव्हीमध्ये एलईडी हेडलँप, सनरुफ, क्लायमॅट कंट्रोल, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि कनेक्टेड कार-टेक प्रणालीही असेल. ही गाडी भारतात नेमकी कधी लाँच करणार हे जीपने अजून स्पष्ट केलेलं नाही. पण, तिची किंमत १०,००,००० पासून सुरू होईल असा अंदाज आहे.(Jeep Sub-4m SUV)
भारतात या गाडीची स्पर्धा व्हिटारा ब्रेझा, ह्युंदे व्हेन्यू, टाटा निक्सॉन, फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा एक्सयुव्ही३०० आणि होंडा डब्ल्यूआरव्हीशी असेल.(Jeep Sub-4m SUV)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community