Pune University : डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यासह १० जणांना जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

91
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Pune University) ७६ वा वर्धापनदिन १० फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्या जाणाऱ्या जीवनसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा विद्यापीठाच्या वतीने विविध क्षेत्रातील १० नामवंत व्यक्तींना हा  पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. तर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी हे या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत.
विद्यापीठाच्या  (Pune University) वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात समग्र कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
या वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम, पुरातत्व व मूर्तिस्थापत्य संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमलता बीडकर, नामवंत शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ प्राध्यापक व सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकिर आणि सुप्रसिद्ध उद्योजक आर. एन. शिंदे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार घोषित करण्यात येत आहे, अशी माहिती कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली.  (Pune University)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.