मोठी दुर्घटना: झारखंडमध्ये बस नदीत कोसळून ७ जणांचा मृत्यू, ४५ जखमी

झारखंडच्या गिरीडीह येथून रांची येथे जाणारी खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. लोकांना कीर्तनाला घेऊन जाणाऱ्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

( हेही वाचा : आता RTO मध्ये जायची गरजचं नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससह या ५८ सेवा पूर्णपणे डिजिटल)

बस नदीत कोसळून ७ जणांचा मृत्यू, ४५ जखमी

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी उशिरा हा भीषण अपघात झाला. गिरडीहहून 52 प्रवाशांना घेऊन रांचीला जाणारी बस अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या 45 जणांना हजारीबाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना अथक प्रयत्नानंतर बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक रांचीच्या किर्तन कार्यक्रमासाठी जात होते. त्यादरम्यान, हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या जखमींना गॅस कटरच्या सहाय्याने बसला कापून बाहेर काढण्यात आले आहे. या गाडीत अनेक लोक अडकले होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here