रिचार्ज महागणार! Jio, Airtel आणि VI चे हे आहेत नवे दर

176

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सारख्या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एखदा महागाईचा झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्या पुन्हा एकदा आपले रिचार्ज प्लॅन महाग करणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या अहवालानुसार, खासगी टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. ही वाढ तब्बल 10 ते 12 टक्के इतकी असणार आहे. यापूर्वी या कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ केली होती.

(हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय, गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवर बंदी)

अशी होणार दरवाढ

अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म विल्यम ओ नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्या त्यांच्या दरात 10-15 टक्के दरवाढ करणार आहे. या दरवाढीनुसार, 200, 185 आणि 135 रूपये युजर्स प्लॅन होणार आहे आणि ही दरवाढ झाली तर सामान्य नागरिकांसह कोट्यावधी युजर्सना त्यांचा फटका बसणार आहे.

(हेही वाचा – मुंबई लोकलच्या Odd वेळांमागचं गणित माहीत आहे का?)

दिवाळीदरम्यान प्रीपेड रिचार्ज प्लॅन महागणार

ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार, या कंपन्या दिवाळीदरम्यान त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवू शकतात. या टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किमती 10 ते 12 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 10 ते 12 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. असे झाले तर रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांचा सरासरी युजर्स प्लॅन अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये वाढू शकतो.

(हेही वाचा – तो जेवायला जाताना पाकीट विसरला, म्हणून क्रेडिट कार्डचा जन्म झाला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.