रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतीच केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ४५वी वार्षिक सर्वसाधरण सभा सोमावरी पार पडली. यावेळी Jio 5G सेवा लॉन्च करण्याची घोषणा करण्यासह कंपनीने Jio Phone 5G लाँच करण्याचीही घोषणा केली आहे. हा फोन पुढील वर्षी लॉन्च होण्याची अपेक्षा असल्याचेही अंबानींकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – दिवाळीत होणार जिओ 5G चा धमाका, मुकेश अंबानींची मोठी घोषणा)
हा Jio Phone 5G गूगल आणि क्वॉलकॉम (Qualcomm) भागीदारीत लॉन्च केला जाणार आहे. 5G कनेक्टिव्हिटीसह हा सर्वात स्वस्त फोनदेखील असणार आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरसह लॉन्च केला जाणार असून, या फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल, असे सांगितले जात आहे.
काय आहेत संभाव्य स्पेसिफिकेशन, फीचर्स
- Jio Phone 5G मध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी लेन्स आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
- 5,000mAh बॅटरी असून जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
- चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील फोनमध्ये असू शकतात.
- Jio Phone 5G च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 6.5 इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले असणार आहे.
- HD + IPS LCD डिस्प्ले हा 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह असेल.
- या फोनला स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसर आणि 4 GB रॅमसह 32 GB स्टोरेज देण्यात येणार असून हा सर्वात स्वस्त 5G प्रोसेसर आहे.