Jio World Plaza : रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये येणार ‘हे’ आंतरराष्ट्रीय ब्रँड

रिलायन्सने वांद्रे-कुर्ला संकुलात उभारलेल्या वर्ल्ड सेंटरमध्ये भारतातील सगळ्यात मोठा आणि अद्ययावत मॉलही उभा राहत आहे आणि विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच आपलं आऊटलेट उघडतील हे जगातील टॉपचे ब्रँड. 

213
Jio World Plaza : रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये येणार 'हे' आंतरराष्ट्रीय ब्रँड
Jio World Plaza : रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये येणार 'हे' आंतरराष्ट्रीय ब्रँड
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्सने वांद्रे-कुर्ला संकुलात उभारलेल्या वर्ल्ड सेंटरमध्ये भारतातील सगळ्यात मोठा आणि अद्ययावत मॉलही उभा राहत आहे आणि विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच आपलं आऊटलेट उघडतील हे जगातील टॉपचे ब्रँड. (Jio World Plaza)

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अलीकडेच वांद्रे-कुर्ला संकुल इथं कंपनीच्या जिओ वर्ल्ड प्लाझा या अत्याधुनिक मॉलचं उद्घाटन केलं. या मॉलच्या निमित्ताने जगातील काही आघाडीचे ब्रँड भारतात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यासाठी रिलायन्स कंपनीने या ब्रँडशी करारही केले आहेत. (Jio World Plaza)

असे कुठले ब्रँड भारतात पहिल्यांदाच येणार आहेत जाणून घेऊया…
बॅलेन्सियागा

बॅलेन्सिएगा हा जागतिक स्तरावरील लग्झरी फॅशन ब्रँड आहे. अलीकडेच या ब्रँडच्या भारतातील रिटेल ऑनलाईन विक्रीचे हक्क रिलायन्स कंपनीनेच घेतले आहेत. त्यानंतर आता हा ब्रँड भारतात आपलं पहिलं ऑफलाईन आऊटलेट उघडणार आहे ते जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये. (Jio World Plaza)

रिमोवा

रिमोवा हा जर्मन लग्झरी लगेज आणि सुटकेस बनवणारा ब्रँड आहे. या ब्रँडनेही अलीकडेच रिलायन्स रिटेलशी ऑनलाईन विक्रीसाठी करार केला आहे. आता ऑफलाईन पद्धतीचं कंपनीचं पहिलं आऊटलेट वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू होणार आहे. ही कंपनी जगभरातील प्रसिद्ध लोकांसाठी लगेज बनवते. त्यांच्या एकेका बॅगची किंमत लाखांमध्ये असते. (Jio World Plaza)

(हेही वाचा – BMC : मुंबईतील १०० किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेने पाण्याने धुतले)

EL&N कॅफे

हा कॅफे खासकरून तरुणांमध्ये लोकप्रिय आहे आणि तरुण इथं जाऊन इन्स्टाग्राम व्हीडिओ बनवतात. गेल्यावर्षीच रिलायन्स रिटेल्सने या कॅफेबरोबर भारतात येण्यासाठी करार केला होता. (Jio World Plaza)

ग्लोर्गिओ अरमानी कॅफे

भारता बाहेर अरमानी कॅफे म्हणून तो ओळखला जातो. जगभरात याची आऊटलेट्स आहेत आणि हा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. रिलायन्सने २०२० पासून या ब्रँडशी कराराची बोलणी सुरू केली होती. पण, अजून करार पूर्ण झाला नसल्याचं समजतंय. पण, रिलायन्सचे प्रयत्न सुरू आहेत. इटलीतील लग्झरी डिझायनर ग्लोर्गिओ अरमानी या ब्रँडचा मालक आहे. ग्लोर्गिओ हा मुलांसाठीचा ब्रँड आहे. तर याच कंपनीचा आणखी एक ब्रँड पॉटरी बार्न आधीच भारतात आला आहे. (Jio World Plaza)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.