सोलापूरात शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या बेकायदेशीर आंदोलनाचा निषेध

196

सोलापूर डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राचार्या मनिषा शिंदे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बेकायदेशीर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संस्था व बाह्य संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे या प्रशासकीय बाबीला राजकीय स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळेच जे.जे.रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयाने या आंदोलनाचा निषेध केला आहे.

( हेही वाचा : सोलापूरात शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयातील प्राचार्यांच्या विद्यार्थ्यांनी केल्या खोट्या तक्रारी )

आंदोलनाचा निषेध 

परिचर्या महाविद्यालयीन स्तरावर असे बेकायदेशीर आंदोलन होणे, याला असे राजकीय स्वरूप प्राप्त होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. विद्यार्थी परिचारीकांनी शिस्तबद्ध वर्तन करणे हाच परिचर्या शिक्षणाचा महत्वपूर्ण भाग आहे. मनिषा शिंदे यांची तक्रार झाल्यानंतर संबंधित चौकशी होणे, त्या संबंधित प्रशासकीय कार्यवाही होणे अजून बाकी आहे. तरीही त्यांच्या विरुद्ध आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात त्यांच्याविरुद्ध मानहानीकारक घोषणाबाजी केली जात आहे. ही बाब केवळ शिंदे यांच्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिचर्या अध्यापकांशी निगडीत आहे. अशी विघातक वृत्ती वेळीच रोखणे आवश्यक आहे, जेणेकरुन परिचर्या व्यवसाय व शिक्षण याची शिस्तबद्धता टिकून राहण्यास मदत होईल व परिचर्या अध्यापकांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही या आंदोलनाचा जे.जे.रुग्णालयातील परिचर्या महाविद्यालयामधील शिक्षकवृंदांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच याबाबत प्रशासकीय कार्यवाही व्हावी अशी विनंती परिचारिकांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.